लायन्स क्लब अलिबागचे मोफत नेत्र तपासणी शिबिर अलिबाग, दिनांक १० येथील लायन्स क्लब आणि क्षात्रैक्य समाज अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने समाजाच्या कुरुळयेथील भव्य सभागृहात नेत्र तपासणी शिबिर संपन्न झाले. यामध्ये साधारण सत्तरहून अधिक नेत्ररुग्णांची रक्तातील साखर, रक्तदाब तसेच मोतिबिंदू, काचबिंदू आणि डोळ्यांच्या इतर समस्यांबाबत तपासणी करण्यात आली. यामध्ये नेत्रदोष आढळलेल्या रुग्णांना पुढील मोफत उपचारासाठी लायन्स फाउंडेशनकडे संदर्भित करण्यात आले. यावेळी प्रमुख उपस्थितांमध्ये लायन्स क्लब अलिबागचे अध्यक्ष प्रदीप नाईक, सचिव महेश कवळे, रिजन चेअरपर्सन गिरीश म्हात्रे, अविनाश राऊळ, महेंद्र पाटील, यांच्यासह क्षात्रैक्य समाज अध्यक्ष द्वारकानाथ नाईक, उपाध्यक्ष अभिजित राणे, रवींद्र वर्तक, श्रीनाथ कवळे, मोहन वर्तक, मनोज राऊळ, ॲड प्रसाद पाटील,ॲड समाधान पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
Benefited People | 65 |
Raised Of Amount | 0 |
Donated Of Amount | 250000 |