Lunches served to all cancer patients staying at Bharat Sevasram Sangha, Sector 31A, Vashi on 29.03.26
महावीर जयंतीच्या औचित्याने महारक्तदान शिबीराचे आयोजन अलिबाग, दिनांक ३१ लायन्स क्लब ऑफ अलिबाग आणि कच्छी भवन ट्रस्ट अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने महारक्तदान शिबिराचे कच्छी भवनयेथे आयोजन करण्यात आले. लायन्स क्लब ऑफ अलिबागसह प्रशांत नाईक मित्रमंडळ, डायमंड अलिबाग, अलिबाग रेवस मिनीडोअर संघटना, ऑटोरिक्षा संघटना, आगरी समाज संस्था, उज्ज्वल भविष्य सामाजिक संस्था, माणुसकी प्रतिष्ठान, मुंबई कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंट यांचा सहभागाने कच्छ युवक संघ एंकरवाला रक्तदान अभियानात मोठ्या प्रमाणावर रक्त संकलनाचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवण्यात आले. यावेळी उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला असून एकूण १६५ रक्तदात्यांनी रक्तदान करुन, तेवढ्याच संख्येने रक्त संकलित केले. यावेळी प्रमुख उपस्थितांमध्ये अलिबाग नगराध्यक्षा अक्षया नाईक, उपनगराध्यक्षा ॲड मानसी म्हात्रे, लायन्स क्लब ऑफ अलिबागचे अध्यक्ष तथा नगरसेवक प्रदीप नाईक, फर्स्ट डिस्ट्रिक्ट गव्हर्नर लायन प्रवीण सरनाईक, ज्येष्ठ लायन कांतिलाल शहा , रिजन चेअरपर्सन गिरीश म्हात्रे, सेक्रेटरी महेश कवळे, खजिनदार अमोघ किंजवडेकर, डिस्ट्रिक्ट कोऑर्डिनेटर लायन नयन कवळे, रणजित जैन, भावेश पटेल , धर्मेश देढिया, महेंद्र पाटील, अविनाश राऊळ, ॲड गौरी म्हात्रे, संतोष पाटील, भगवान मालपाणी, नितीन शेडगे, समीर कवळे, मिलिंद मगर, मेहुल पाटील, डॉ नितीन गांधी, संजय माळी, प्रकाश कवळे, अनिल आगाशे, विकास घरत, उज्ज्वला चंदनशिव, जिल्हा रक्त संक्रमण अधिकारी डॉ गोसावी यांच्यासह लायन्स अलिबाग आणि कच्छी भवनचे सदस्य , रक्तदाते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
vadapav activity by NPST
vadapav activity by NPST
served to all cancer patients staying at Bharat Sevasram Sangha,Sector 31A, Vashi
Annaj Daan given to Bharat Sevashram Sangh at Nasik on 17.03.26
A sanitary napkin vending Machine donated for womens of Swami Vivekananda School, Sanpada on 15.03.26