• District 3231A4

    Be The Sunshine

Club Social Activities

अलिबाग लायन्स फेस्टिवल २०२६

23 Jan 2026

लायन्स क्लब ऑफ अलिबागच्या वतीने दिनांक २३जानेवारी, २०२६ ते २७जानेवारी २०२६ अशा पाच दिवसांत अलिबाग लायन्स फेस्टिवल या सिग्नेचर ॲक्टिव्हिटीचे भरगच्च आयोजन करण्यात आले. यावेळी लायन्सचे इंटरनॅशनल डायरेक्टर, तसेच डिस्ट्रिक्ट गव्हर्नर विजय सूर्यवंशी, फर्स्ट डिस्ट्रिक्ट गव्हर्नर प्रवीण सरनाईक, सेकंड डिस्ट्रिक्ट गव्हर्नर विजय गणात्रा, डिस्ट्रिक्ट कोऑर्डिनेटर तथा अलिबाग लायन्स फेस्टिवलचे जनक अनिल म्हात्रे, नयन कवळे, परेश भतेजा, भगवान मालपाणी, अध्यक्ष प्रदीप नाईक सचिव महेश कवळे खजिनदार अमोघ किंजवडेकर तसेच शंभराहून अधिक लायन्स सभासद, नागाव, मुरुड, पोयनाड, श्रीबाग, डायमंड अलिबाग, मांडवा व अन्य लायन्स सभासद उपस्थित होते. यामध्ये साधारण दोनशे सत्तरहून विविध स्टॉल्स होते. एकाच छताखाली विविध जीवनावश्यक वस्तू मिळण्याकामी, तसेच खवय्यांसाठी अप्रतिम मेजवानी होती. यामध्ये महाराष्ट्रातील आणि बाहेरीलही व्यापारी वर्गाला मोठा फायदा झाला. तसेच अनेक मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले.

Benefited People 100000
Raised Of Amount 1000000
Donated Of Amount 0