जागतिक क्षयरोगदिन २४ मार्च पौष्टीक आहार वाटप लायन्स क्लब ऑफ अलिबागच्या वतीने २४मार्च या जागतिक क्षयरोगदिनाच्या औचित्याने येथील जिल्हा शासकीय रुग्णालयातील गरजू रुग्णांना पौष्टिक फूड पॅकेट्सचे वाटप करण्यात आले. यावेळी येथील क्षयरोग नियंत्रण कक्षातील ६८हून अधिक रुग्णांना पौष्टिक आहार वाटप करण्यात आला. त्याचसह आवश्यक संख्येने पाण्याच्या बॉटल्सही वितरीत करण्यात आल्या. यावेळी लायन्स क्लब ऑफ अलिबागचे अध्यक्ष प्रदीप नाईक, सचिव महेश कवळे, खजिनदार अमोघ किंजवडेकर, लायन महेंद्र पाटील, समीर कवळे, अविनाश राऊळ यांच्या सह वैद्यकीय अधिकारी, तेथील वैद्यकीय स्टाफ, परिचारिका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. यावेळी घोषणा, पत्रके, घोषवाक्ये प्रदर्शित करुन, नियमित उपचाराने क्षयरोग १००%बरा होतो, असे रुग्णांना छोटेखानी व्याख्यानातून सांगण्यात आल्याने, रुग्णांना भावनिक आनंदासह त्यांचा आत्मविश्वास वाढला.
| Benefited People | 68 |
| Raised Of Amount | 0 |
| Donated Of Amount | 10000 |